Skip to content Skip to footer

घराबाहेरील संकटाशी लढाई करण्यास आपलं सरकार मजबूत आहे – मुख्यमंत्री

घराबाहेरील संकटाशी लढाई करण्यास आपलं सरकार मजबूत आहे – मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज लॉक डाऊन लागू होऊन पाच दिवस उलटूनही आज घराबाहेर नागरिकांची गर्दी दिसुन येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच थांबण्याची विनंती केली आहे. आपण घरात आपल्या सर्व प्रियजनांसोबत आहात. हा वेळ आनंदी राहून घालवा. यावेळी त्यांनी घरात विरंगुळा म्हणून इंडोअर खेळ जसे की कॅरम, बुद्धिबळ किंवा इतर गोष्टी करण्याचे सुचवले.

आज डॉक्टर्स असतील किंवा पोलीस असतील हे अपार कष्ट घेत आहे. त्यामुळे आपल्याला हे संकट परतवायच असेल, तर नागरिकांनी घरी थांबणे गरजेचं आहे. शासनाकडून सर्व व्यवस्था ठेवली जात आहे, आरोग्य सुविधा वाढवण्याच आमचे काम सुरु आहे, नागरिकांनी फक्त घरी थांबा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

Leave a comment

0.0/5