Skip to content Skip to footer

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांनी कोरोना युद्धात पुढे येऊन सरकारला मदत करावी – मुख्यमंत्री

सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे त्याच पाठोपाठ मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 1100 च्या पार होताना दिसत आहे. यावर राज्य सरकार काय पाऊले उचलत आहे याची माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारने जे दिले ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिले आहे असा गैरसमज करु नका. सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी ज्यांनी मेडिकल क्षेत्रात काम केलं आहे, अशा निवृत्त सैनिकांनी, माजी अधिकाऱ्यांनी पुढे यावे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ज्यांनी मेडिकल बाबत शिक्षण घेतले आहे, ज्यांना हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे, त्यांना पुढे येऊन या युद्धात सरकारला मदत करण्याचे अहवान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच या युध्दात सहभागी होण्यास इच्छुक व्यक्तींनी आपली माहिती Covidyoddha@gmail.com या मेलवर पाठवण्याची विनंती त्यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5