Skip to content Skip to footer

वर्षभरात सीमा भागात अद्ययन सुरु, उदय सामंतांची घोषणा……!

वर्षभरात सीमा भागात अद्ययन सुरु, उदय सामंतांची घोषणा……!

            सीमा भागातील मराठी विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारण्याचा शुभारंभ काल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोल्हापूर येथे पार पडला. चालू शैक्षणिक वर्षापासूनच येथे अध्ययनाचे काम सुद्धा सुरु होईल, अशी ग्वाही यावेळ सामंत यांनी यावेळी पत्रकार माध्यमांना दिली.
                     बेळगाव आणि चंदगड या मार्गावर शैक्षणिक संकुल सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. चंदगड तालुक्यातील तुडये, म्हाळुंगे आणि शिनोळी या ठिकाणच्या जागेची पाहणी केली असून जागा ताब्यात येण्यास वेळ लागणार आहे. तथापि या परिसरातील भाडेतत्वावर जागा अथवा इमारती घेवून येत्या शैक्षणिक वर्षापासून अध्ययनाचे काम सुरु करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.
                युजीसी व परीक्षा या प्रश्नावर बोलतांना सामंत यांनी करोनाच्या काळात परिक्षा घेता येणार नाही यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाम आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांना ऐच्छिक परिक्षा द्यायची आहे, ते देवू शकतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5