Skip to content Skip to footer

केवळ व्हॉट्सअपवर कोणीतरी सांगितलं म्हणून कोणताही काढा घेऊ नका – निलम गोऱ्हे

केवळ व्हॉट्सअपवर कोणीतरी सांगितलं म्हणून कोणताही काढा घेऊ नका – निलम गोऱ्हे

                 वाढत्या संकटात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून वेगवेगळे मॅसेजेस साध्य मोबाईलवर फिरताना दिसत आहे. यावर आता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे. ‘कुणी तरी व्हॉट्सअपवर सांगितले म्हणून उगाच कोणताही काढा करुन घेऊ नका, ओळखीतल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन त्याचे सेवन करा.

                त्या म्हणाल्या की, ‘कोरोनाची साथ जशी वाढतेय त्याच बरोबर यावर प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत हे सांगणाऱ्या मेसेजचं प्रमाण सुध्दा वाढले आहे. आयुर्वेदीक उपचारांसाठी जे प्रयत्न सुरु आहेत ते स्थुत्य आहेत. परंतू, कुढलाही सर्दी खोकला नसताना रोज अमुक एका पध्दतीने काढे घेतले पाहिजेत अशी जेव्हा माहिती जेव्हा लोकांकडे येते तेव्हा तुमच्या ओळखीतील डॉक्टरांकडे त्याची खातरजमा करुन घ्यावी.

Leave a comment

0.0/5