Skip to content Skip to footer

जर पुन्हा टीका केली तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ…!

जर पुन्हा टीका केली तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ…!
             मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांकडून तडीपारची नोटीस मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शिसवेना आणि ठाणे पालकमंत्र्यांविरोधात टीका करण्यास सुरवात केली होती. आता या टीकेला शिवसेना नगरसेवकाने जोरदार उत्तर दिले आहे.
            शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी समज वजा इशारा टीका करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना दिलेला आहे. जर पालकमंत्री यांच्याविरोधात कोणी टीका-टिपणी केली तर त्याला शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल. असे महेश गायकवाड म्हणाले आहेत.
               पालकमंत्र्यानी कोल्हापूर, सांगलीचा पूर असो किंवा आता आलेले कोरोना संकट असो, अशा प्रत्येक वेळी आपला जीव धोक्यात घालून काम केल आहे. त्यांना कुणाच्या पोचपवतीची गरज नाही,” असे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड म्हणाले.
              तसेच “सध्या कोरोना संकट असल्याने शिवसैनिक संयम ठेवून आहेत. पण याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि सहन करू असे नाही. या पुढे जर टीका केलीत तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ,” असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे

Leave a comment

0.0/5