Skip to content Skip to footer

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर !

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारने जिल्हा बंदी अजून काही उठवलेली नाही. त्यातच काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना कोकणात गावी जाण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. याची नियमावलीची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी कोकणात निघाले आहेत. त्यांनी १२ ऑगस्टच्यापूर्वी कोकणात पोहोचणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर त्यांना केवळ दहा दिवसच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच जे चाकरमानी एसटीने प्रवास करतील त्यांना ई-पासची आवश्यकता नाही भासणार नाही मात्र प्रायव्हेट गाडी करणाऱ्यांना पास काढणे आवश्यक असणार आहे.

कोकणवासीयांची एसटीची सेवा पुरवली जाणार आहे. त्यासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आलेली आहे. यासाठी जर २२ जणांचा एकाच गावातील प्रवासी ग्रुप असेल तर त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्यात येईल. हव्या तितक्या बस सोडण्यात येईल मात्र कोणत्याही प्रकारची गर्दी होता काम नये असे सुद्धा आव्हान परब यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5