Skip to content Skip to footer

“गूगल क्लासरूम”च्या माध्यमातून राज्यातील शाळा होणार सुरु…..!

“गूगल क्लासरूम”च्या माध्यमातून राज्यातील शाळा होणार सुरु…..!
राज्यभरात कोरोनाचे संकट अधीकच गडद होत चालले आहे. त्यात कोरोनाग्रस्त रुग्नांच्या मृत्यूचे प्रमाण सुद्धा काही अंशतः वाढले आहे. त्याच पाश्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेज इतक्यातच सुरु न करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, गुगलचे भारतातील विक्री प्रमुख संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना आता कोणत्याही ठिकाणावरून शिक्षण घेणे सुलभ होणार आहे.
या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच शिक्षकांना या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेणे तसेच प्रकल्प देऊन त्यांचे मुल्यमापन करणेही सुलभ होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे.

Leave a comment

0.0/5