Skip to content Skip to footer

कोल्हापुरातील ९७ गावांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा घेतला निर्णय….!

कोल्हापुरातील ९७ गावांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा घेतला निर्णय….!

कोरोनाच्या वाढत्या संकटात संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ९७ गावांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. त्यात काही अंशतः मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून कोरोनाचा प्रसार होऊ नये, या उद्देशाने ९७ गावातील गावकऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम विविध गावात राबवला जावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध पोलिस ठाण्यात ग्रामस्थ, तरुण मंडळी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर पोलिस उपअधीक्षकांनी देखील बैठक घेतली. या बैठकांना ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे कळत आहे. आतापर्यंत ३०३ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले. पण त्यापुढे जाताना ९७ गावांनी सार्वजनिक गणेशमूर्ती बसवणारच नाही, असे स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5