Skip to content Skip to footer

कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द…..!

कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द…..!
             कोरोना संसर्गच्या वाढत्या संकटामुळे राज्यात काही दिवसात येणारे सण अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्याच पाश्वभूमीवर मुंबई आणि ठाणे शहरात दहीहंडीच्या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यात साजरी होणारी दहीहंडी साता-समुद्रापार नावाजलेली आहे.
           दहीहंडीमुळे वेगळी ओळख निर्माण केलेल्या  मुंबई, ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहायला मिळणार असून आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर दुसरीकडे विविध पक्षाने देखील हा सण रद्द करून गोकुळ अष्टमीचा जन्मउत्सव पूजा अर्चाकरून साजरा केला आहे.

Leave a comment

0.0/5