Skip to content Skip to footer

कॅप्टन अमोल यादव यांच्या सर्व प्रयत्नांना ठाकरे सरकार सहकार्य करणार !! – सुभाष देसाई

कॅप्टन अमोल यादव यांच्या सर्व प्रयत्नांना ठाकरे सरकार सहकार्य करणार !! – सुभाष देसाई

कॅप्टन अमोल यादव यांनी स्वदेशी बनावटीचे पहिले सहा आसनी विमान तयार केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी १५ ऑगस्ट रोजी सर्व भारतवासीयांना दिली. आता कॅ. अमोल यादव यांच्या पुढील प्रकल्पासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बोलून दाखविले आहे.

कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्याचे प्रात्यक्षिक देखील यशस्वी झाले आहे. यापुढे नागरी उड्डयण मंत्रालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल. त्यांना प्रकल्प उभारण्यासाठी जागा दिली जाईल, असे उद्योग मंत्र्यांनी आता सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5