Skip to content Skip to footer

महाड : बचाव कार्य वेगाने करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

महाड शहरात पाच माजली इमारत कोसळल्याची बातमी काल समोर आली होती. तारीक गार्डन असे या इमारतीचे नाव असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० हुन अधिक मानस अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पाश्वभूमीवर बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहे.

दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी  मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासकीय यंत्रणांना वेगाने मदतकार्य करण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आधी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5