Skip to content Skip to footer

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करतानाच, राज्यातील क्रीडा जगताला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांचे आज भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरण करण्यात आले. यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, हॉकीपटू रानी रामपाल यांना देण्यात आला.

Leave a comment

0.0/5