Skip to content Skip to footer

मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांकडून पालिकेने गोळा केले इतके रुपये

कोरोनाच्या वाढत्या संकटात मागच्या चार महिन्यांपासून मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यातच मुंबईत कोरोना रुग्नांच्या संख्येत वाढ होत असलेली पाहून मनपाने मुंबईत मास्क घालणे बंधनकारक केले होते. तसेच मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाही करण्याचे आदेश दिले होते. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून मनपाने दंडात्मक कारवाही म्हणून १ हजार पर्यंत दंड आकारण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले होते.

९ एप्रिल २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान ‘मास्क’न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या एकूण २ हजार ७९८ नागरिकांकडून रुपये २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त ‘फेसमास्क’ योग्यरित्या परिधान न करणा-या व्यक्तींना समज देण्याची कार्यवाही केल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.आज महापालिकेद्वारे ‘मास्क’ वापरण्याविषयक जनजागृती सातत्याने केली जात आहे.

Leave a comment

0.0/5