कंगनाने मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक मराठी सिने-कलाकारांनी तिच्यावर जोरदार टीका केली होती. त्यात प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कंगनाची आणि मराठी कलाकारांच्या मिळकतीची तुलना करत ” स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात” अशी कमेंट मराठी कलाकारांची खिल्ली उडवली होती.
युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अवधूत वाघ यांच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत ही अतिशय निंदनीय बाब आहे असे म्हटले आहे. ‘मराठी कलाकारांबद्दल असे वक्तव्य करणारे हे भाजप अधिकृत प्रवक्ते आहेत! अतिशय निंदनीय बाब आहे! मतांच्या लालसेपायी हे किती महाराष्ट्र द्रोही होणार ??? मराठी कलाकारांवर इतका राग का तर त्यांनी मुंबईवर अभिमान व प्रेम व्यक्त केले.. हे भाजप ला का झोम्बले ?’ असे त्यांनी म्हटले आहे.