Skip to content Skip to footer

मराठवाड्याच्या सूखाची आणि समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार – मुख्यमंत्री

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांची शिकवण आहेच, पण त्याच बरोबरीने अन्यायाविरुद्ध लढून अन्याय मोडून, तोडून टाकणे आणि स्वातंत्र्य मिळवणे ही आपल्या भूमीची आणि मातीची खासियत आहे, असे उद्गार मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

यावेळी त्यांनी आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला हवी की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि तुमच्यासोबत आम्ही सुद्धा शपथ घेतो आहे की जी ताकद, अधिकार तुम्ही आम्हाला दिला आहे, त्याचा वापर आम्ही मराठवाड्याची सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरेन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त राज्यातील नागरिकांशी संवाद साधताना अनेक विषयांमध्ये हात घेतला कोरोनाशी लढताना मी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोहीम दिली आहे, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”! ज्याप्रमाणे त्यावेळेला ध्येयाने, उद्देशाने प्रेरित होऊन सगळे अबालवृद्ध मराठवाडा मुक्त करण्यासाठी युद्धात उतरले होते, तसेच मला मराठवाड्याचे नागरिक कोरोनापासून मुक्त होण्याचा लढाईमध्ये पाहिजेत, असे बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5