Skip to content Skip to footer

ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यासाठी हालचालींना वेग

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य निवडणूक आयोगाने राज्यात ग्रामपंचायत, महानगर पालिका, नागरपंचायत, तसेच विविध संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यसाठी निवडणुका आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल ते जून २०२० कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात येऊ शकतो.

Leave a comment

0.0/5