Skip to content Skip to footer

कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना सुरक्षा किटचे वाटप… माझे कुटुंब माझी जबाबदारी ” चे साधले औचित्य..

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार कोरोनावर मात करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही आरोग्य मोहीम महाराष्ट्रभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता समूह संसर्ग लक्षात घेऊन महाराष्ट्रात ठाकरे सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे.

याच मोहिमेचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील संघटीत व असंघटीत असे सुमारे ८० हजाराहून अधिक कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. दि. १८ रोजी कोल्हापूर येथील मुस्कॉन लॉनवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत जवळपास ३०० कामगारांना सुरक्षा किटचे वाटप हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या सुरक्षा किटमध्ये मास्क, हातमोजे, बॅग, जेवणाचा डबा, हेल्मेट, चटई, बूट, पाण्याची बाटली, बॅटरी व इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.याप्रसंगी शोएब शेख, जैद मुजावर, सुनील शेलार, मिनहाज शेख, श्रीनिवास कालगे, युनूस सनदी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5