Skip to content Skip to footer

मुंबईतील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये -मुंबई आयुक्त

काल रात्रीपासून संपूर्ण मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून मुंबई पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणि साचले आहे. तर दादर, माटुंगा, चेंबूर, सायन अशा सखल भागात रात्रीपासूनच पाणी साचायला सुरवात झालेली आहे.

येत्या २४ तासात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आज खाजगी कार्यलयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पाडण्याचे आवाहन मुंबई आयुक्त चहल यांनी केले आहे.

“कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढचे २४ तास अजून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईत आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्वांनी घरी राहावं, असं आवाहन आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं आहे.

Leave a comment

0.0/5