Skip to content Skip to footer

पालिकेच्या शिव रुग्नालयात २५० यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईत वाढत्या कोविड संकटात मुंबई महानगर पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचा कोविडच्या संकटात हातभार लावण्याचा मोलाचा वाटा होता. त्यातच सायन हॉस्पिटलमध्ये एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल १२०० अत्यावश्यक इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्नांवर अतिदक्षता विभागात यशस्वी उपचार करण्यात आले असून विविध आजारांवर २५४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

यामध्ये मेंदू, फ्रॅक्चर, प्रसूती, अपघाताच्या शस्त्रक्रियांचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे हजारो कोरोना रुग्नांवर उपचार सुरु असताना दमदार कामगिरी करण्यात आलेली आहे. याबाबत शिव रुग्नालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी माहिती दिलेली आहे. पालिकेच्या रुग्नालयात एप्रिल महिन्यापासून कोरोना रुग्नांवर सुद्धा उपचार सुरु आहे. शिव रुग्नालयात एकूण १७५० बेडपैकी ३५० बेड हे कोरोना रुग्नांसाठी राखीव आहेत.

Leave a comment

0.0/5