अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस योग्य दिशने तपास करत असताना त्यांच्या चौकशीवर संशय व्यक्त करत सदर तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यात सोशल मीडियाच्या माद्यमातून फेक अकाउंट काढून मुंबई पोलिसांच्या विरोधात मोहीम चालवली गेली होती. असे वक्तव्य मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले.
त्यातच राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगतानाच काही मीडियानेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम सुरू केली होती, असा आरोपही त्यांनी केला. सिंग म्हणाले, मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. या षडयंत्रामागे कोण आहेत याचा तपास केला जात आहे.
आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहिती सिंग त्यांनी दिली.