सुशांतची बहिण बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे ड्रग्ज देत होती?
सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. या अहवालानुसार एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतची हत्या करण्यात आल्याचे साफ नाकारले आहे.
यावर आता एक नवीन खुलासा समोर येत आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्जच्या दिशेने तपास सुरु असून, अनेक सेलिब्रेटींची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. यादरम्यान सुशांतची एक बहिण बनावट प्रिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली.