Skip to content Skip to footer

‘आपण हसे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला’, अशीच काहीशी नितेश राणेंची अवस्था – वैभव नाईक

‘आमदार नितेश राणेंना मी सांगू इच्छितो की, मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे. त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडे विचारणा केली असती तर गांजाची शेती कुणाच्या अंगणात पिकते याचा त्यांना त्वरित उलगडा झाला असता. “आपण हसे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला”, अशीच काहीशी नितेश राणेंची अवस्था झालेली आहे’, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे पिता-पुत्रांवर केली आहे.

पुढे बोलताना नाईक म्हणाले की, मुळात ‘संस्कार’ हा शब्दच नितेश राणेंच्या तोंडी शोभत नाही. कारण या शब्दाशी त्यांचा दूरान्वयेही संबंध नाही. चिंटू शेखवर गोळीबार करण्याचे, हॉटेल व्यावसायिक हितेश केसवाणी कडून खंडणी उकळण्याचे, गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड करण्याचे, वेंगुर्ल्यात विलास गावडेच्या घरावर रात्री अपरात्री लाथा मारून राडा करण्याचे, होंडा शोरुम जाळून टाकण्याचे, सरकारी अधिकाऱ्यांवर बांगडाफेक आणि चिखलफेक करण्याचे संस्कार नारायण राणेंनीच त्यांच्यावर केले होते का…?, असा प्रश्न नाईक यांनी राणे पुत्रांना विचारला आहे.

निलेश राणेंनी ज्या अमानुष पद्धतीने संदीप सावंत या स्वतःच्याच कार्यकर्त्याला मारहाण केली. ते संस्कार नारायण राणेंनीच आपल्या मुलावर केले होते का…?? याचेही उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवे. फक्त संस्कारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जगातील दोन असंस्कृत, असभ्य आणि असंस्कारक्षम मुलांचे नारायण राणे हे पिता आहेत, असेच खेदाने म्हणावे लागेल, असे नाईक यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5