अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध एनयुजे महाराष्ट्र करणार नाही.
रिपब्लिकन चँनलचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलीसांकडून अटक करण्यात आली. २०१८ च्या मे महिन्यात अलिबागच्या कावीर येथील वास्तुविषारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून कामाची भली मोठी रक्कम काम करूनही देण्यात न आल्याने नाईक यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. गोस्वामी यांचे विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे अन्वय नाईक यांच्या पत्नीने या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.