कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या आठ महिन्यापासून बंद असलेली मंदिरे आणि धार्मिक स्थळे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा उघडी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाने ढोल-ताशाच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले तर भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिराच्या आवारात पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावर आता राष्ट्रवादीने भाजपाला टोला लगावला आहे. मोदींच्या आदेशामुळेच मंदिरे बंद होती, असा पलटवार राष्ट्रवादीने भाजपवर केला आहे.
भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतंय, असे मंत्री जयंत पाटील यांनी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केले होते. ‘तसेच मंदिरे उघडण्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला जाऊच शकत नाही. तर हे श्रेय मुख्यमंत्री व राज्य सरकारचे आहे’, असेही ते म्हणाले. ‘लॉकडाऊनच्या काळात मंदिर बंद करण्याबाबत नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला होता याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.