Skip to content Skip to footer

ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर बोलू नये – संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. तसेच विविध ठिकणाहून अनेक शिवसैनिक स्मुर्तीस्थळाला भेट देण्यासाठी दाखल होत होते.

त्यात पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ‘स्मारक की मातोश्री 3?’ असा खोचक सवाल थेट सेनेला विचारला आहे.

दरम्यान, यावर भाष्य करत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे. ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

Leave a comment

0.0/5