Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांचा केला दहशतवादी उल्लेख, कंगनाची पुन्हा वादग्रस्त ट्विट

सिनेअभिनेत्री कंगना राणावत ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक वेळा अडचणीत आलेली आहे. कधी मुंबईच्या पोलिसांवर टीका, कधी मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख, तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख असे वक्तव्य मागच्या महीन्याभरात तिने केले असून स्वतःच्या अडचणी वाढवून घेतल्या आहेत. त्यात आता तिने शेतकऱ्यांचा दहशतवादी उल्लेख करून एका नाव्ह्या वाढला तोंड फोडले आहे.

कंगना ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA ला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेलं नाही’, असे ट्विट तिने केले आहे.

Leave a comment

0.0/5