Skip to content Skip to footer

“चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे” – हसन मुश्रीफ

 

कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असे आवाहन देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना टोला लगावला होता.

यावरूनच राज्याचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, त्यामुळे कुणी राजीनामा द्यायचा प्रश्न नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढवली तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे’, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘शरद पवार देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. ५० वर्षांहून अधिक त्यांचा राजकीय प्रवास आहे. देशातील आणि राज्यातील असा एकही प्रश्न नसेल जो त्यांना माहित नाही. त्यांनी उभी हयात जनतेच्या हितासाठी, विकासासाठी घालवली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील जर पवार साहेबांवर पीएचडी करत असतील तर आम्हाला आनंदच आहे.’, असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

Leave a comment

0.0/5