Skip to content Skip to footer

मग फुलप्रूफ कायदा सर्वोच्च न्यायालयात का? टिकला नाही, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना सवाल

मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ कायदा आहे. त्यात कोणतीही अडचण येणार नाही असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता त्यांच्या या दाव्यावर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला आहे

“जर मराठा आरक्षणाचा कायदा हा फुलप्रूफ कायदा होता तर मग सर्वोच्च न्यायालयात का? टिकला नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी फुलप्रुफ कायदा आणू म्हणून सांगितले होते. या कायद्यामुळे काहीच अडचण येणार नसल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. तुमचा कायदा एवढाच फुलप्रूफ होता तर सर्वोच्च न्यायालयात तो का टिकला नाही?, असा सवाल करतानाच आम्ही तर तुम्ही आणलेला आरक्षण कायदा मान्य केला. त्यावर चर्चाही केली नाही आणि आक्षेपही घेतला नव्हता, याकडे चव्हाण यांनी फडणवीसांचे लक्ष वेधले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेलेच वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. एकूण नऊ ते दहा निष्णात वकील हा खटला लढवत आहेत. पण काही ना काही मुद्यांवर विषय अडत आहे. पण आम्हीही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आता या प्रकरणावर कोर्टात दररोज सुनावणी होणार असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,असे सुद्धा अशोक चव्हाण यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5