Skip to content Skip to footer

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कारवाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले प्रथमच भाष्य

मागच्या काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या कुटुंबियांवर ईडी (सक्तवसुली संचनालय) कडून कारवाही करण्यात आली होती. या कारवाहीत त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तसेच त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची तब्बल सात तास चौकशी सुद्धा करण्यात आली होती.

यासंदर्भात आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ते आज दोन दिवसीय आयोजित हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा आणि राज्यातील विरोधकांचा चांगला समाचार घेतला.

महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोलले तर तुरुंगात टाकले जाते, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणालेत की, प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असं विकृत राजकारण आम्ही करत नाही” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a comment

0.0/5