Skip to content Skip to footer

एटीएम कार्डधारकांमध्ये खळबळ, क्लोन बनवून लाखाची रक्कम काढली

राहाता येथील वकील व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एटीएम कार्डचे क्लोन बनवून गैरवापर करीत अज्ञात चोरट्याने 1 लाख 46 हजार रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली. याबाबत नगर येथील सायबर सेलने अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

राहाता येथील वकील मोहनराव रावजी गाडेकर व त्यांच्या पत्नी माधुरी मोहनराव गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती पत्नींचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राहाता शाखेत खाते आहे. पती-पत्नी दोघांकडेही एटीएम कार्ड आहेत. 28 व 29 डिसेंबर 2018 ला गाडेकर पती-पत्नीच्या बँके खात्यातून सुमारे 1 लाख 46 हजारांची रक्कम काढल्याचा मेसेज त्यांना आला होता. त्यामध्ये मोहन गाडेकर यांच्या खात्यातून 28 डिसेंबर 2018 रोजी 80 हजार व 29 डिसेंबरला 2018 40 हजार असे मिळून 1 लाख 20 हजार तर त्यांच्या पत्नी माधुरी गाडेकर यांच्या खात्यातून 28 डिसेंबरला 26 हजार असे पती पत्नी मिळून दोघांचे खात्यातून एकुण 1 लाख 46 रूपयांची रक्कम चोरली आहे.

एटीएम कार्डव्दारे कोणी पैसे काढलेकाय? याची चौकशी केली असता त्यांना समजले की पती-पत्नी पैकी कोणीही एटीएमचा वापर करून पैसे काढलेले नाहीत. त्यांनी आमच्या खात्यावरील रक्कम गेली कुठे याची चौकशी केली असता त्यांना समजले की एटीएम कार्डचे क्लोन बनवून गैरवापर करून रक्कम लांबविली असण्याची शक्यता वर्तविली गेली त्यांनंतर गाडेकर यांनी दोघांचेही एटीएम कार्ड बॅकेतून ब्लॉक केले वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील मोठी रक्कम वाचली गाडेकर यांनी झालेल्या घटनेबाबत नगर येथील सायबर सेलमध्ये गुन्हा नोंदविला आहे.

Leave a comment

0.0/5