Skip to content Skip to footer

नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई मनपा लवकरच नियमावली करणार जाहीर

मुंबईत कोरोनाचे संकट अदयाप टळलेले नाही. त्यात काही दिवसात येणाऱ्या नाताळ आणि नवं वर्षाच्या पाश्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी बृहमुंबई महानगर पालिका नवीन नियमावली जाहीर करणार आहे. सोमवारी किंवा मंगळवारी या संदर्भातील नियमावली जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सण-समारंभांवर बंधने असताना मोठ्या संख्येने लोक नाइट क्लबमध्ये जमत असल्यामुळे यावर निर्बंध आणण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती समोर येत आहे. नाताळ, नववर्षांला संचारबंदी किंवा नियमावली आणण्याचे भाष्य पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यापूर्वीच केले होते. २० डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. इतकंच नाही तर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याची विनंती पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.

संचारबंदी लागू करण्याच्या मन:स्थितीत राज्य सरकार नाही. पण लोकांनीही वेळीच सावध व्हावं, असा इशाराच आयुक्तांनी दिला होता. २० डिसेंबपर्यंत परिस्थिती पाहून नाताळ आणि ३१ डिसेंबरसाठी नियमावली तयार करण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Leave a comment

0.0/5