Skip to content Skip to footer

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारा २४ तासाच्या आत अटकेत

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर २२ डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे.

गुजरात जामनगरमधून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, मुंबई पोलिसांचे पथक उद्या त्याला मुंबईत घेऊन येणार आहे. गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नावं मनोज दोढिया असून, तो २० वर्षांचा आहे. हे कृत्य का केलं, याचा तपास मुंबई पोलीस लावत आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने गुजरात जामनगरमधून त्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडालीय. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जामनगरमधून बोलत असल्याचं सांगितलं होतं. आपण लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयात फोन करून तक्रार दिल्याची माहिती पेडणेकरांनी दिली होती. अखेर २४ तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

Leave a comment

0.0/5