Skip to content Skip to footer

सोनिया गांधी यांचे पत्र काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले सुपूर्त

राज्यातील दलित आणि आदीवासी समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पत्र काँग्रेस शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांना सुपूर्त केले.

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती, जमातींच्या योजनांबाबत दिलेल्या सूचना रास्त असून, सरकारचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसने कायम या समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांनी दिली होती.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जसे मार्गदर्शन करीत असतात. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यासुद्धा मार्गदर्शन करतात. उभय नेत्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररूपी संवाद आहे. असे थोरात यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5