Skip to content Skip to footer

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा वाशी जवळ अपघात

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा वाशी जवळ अपघात

शिवसेना नेते, नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा वाशी टोल नाक्याजवळ अपघात झाला आहे. मंत्री शिंदे वाशी टोल नाक्यावरून वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जादूटोणा केला जात असल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत पाहायला मिळाले होते. आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. मात्र यामागे मोठं षडयंत्र आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात असल्याचा दावा केला जात होता.

Leave a comment

0.0/5