Skip to content Skip to footer

सिनेअभिनेता सोनू सूदने लगावला कंगना राणावतला टोला

कोरोनाच्या संकटात देवाप्रमाणे धावून येऊन सिनेअभिनेता सोनू सुदने अनेकांना मदतीचा हात पुढे केला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना आपल्या-आपल्या घरी सुखरूप पोहचवण्यासाठी बस, ट्रेन तसेच विशेष विमानाची व्यवस्था सोनू सूदने करून दिली होती.

मात्र आता सोनू सूदने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने अभिनेत्री कंगना राणावतवर नाव न घेता निशाणा साधला आहे. बॉलिवूडमधील ९९ टक्के लोक मादक पदार्थांचे सेवन करतात. कंगनाच्या या वक्तव्यावर सोनूने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, मला या गोष्टीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. जेव्हा बॉलिवूडमधील लोकच बॉलिवूडविषयी काही वाईट बोलतात तेव्हा भावना दुखावल्या जातात असे सोनू म्हणाला.
इंडस्ट्रीमध्ये आम्ही सर्व एक कुटुंब आहोत असे म्हणत सोनू म्हणाला या इंडस्ट्रीमध्ये अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. बॉलिवूडने अनेकांना नाव, समृद्धी मिळवून दिली आहे. ऐकेकाळी सोनू आणि कंगना चांगले मित्र होते. मात्र २०१८ पासून त्यांच्यात वाद सुरू झाला होता.

Leave a comment

0.0/5