Skip to content Skip to footer

अभिनेता सोनू सूद लवकरच आजमावणार राजकीय पटलावर आपले भविष्य ?

मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून महाराष्ट्र अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी देवदूतासारखा अभिनेता सोनू सूद धावून आला होता. त्यात अनेकांना आपल्या घरी पोहचवण्यासाठी सोनुने सर्वोतोपरी मदत केली होती. आता येणाऱ्या काही वर्षात सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार आहे अशी माहिती खुद्द सोनू सूद याने दिली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार सोनू सूद म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मला अजून खूप पुढे जायचे आहे. मी जी स्वप्ने पाहिली ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत आणि मला असे वाटते की, मी प्रथम ते पूर्ण करणे आवश्यक आहे. राजकारणात येण्यासाठी कुठलाही विशिष्ट वेळ ठरलेला नसतो आणि राजकारणामध्ये येण्याचा विचार मी ५ किंवा १० वर्षांनंतर करेल.

पुढे सोनू सूद म्हणाला की, मला वाटते की ज्या गोष्टींमध्ये मी एक्सपर्ट आहे त्या गोष्टी मी अगोदर केल्या पाहिजेत आणि मी त्याला न्याय देऊ शकतो. मी जर सध्याच राजकारणात प्रवेश केला तर गावोगावी जाऊन लोकांना मदत करू शकणार नाही. म्हणून मी आताच राजकारणात प्रवेश करणार नाही कारण मी त्या पदाला सध्या न्याय देऊ शकत नाही. आता एक अभिनेता म्हणून खूप काही करायचे राहिले आहे आणि आता मी ते करण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a comment

0.0/5