Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मध्यरात्री फोन येतो तेव्हा……!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन मला या वर्षीची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे नांगरे पाटील यांना म्हणाले.

या संदर्भात नांगरे पाटलांनी खास फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे. मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला.

मुख्यमंत्री म्हणाले की, विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असं मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोरोनाशी लढा देताना गेले वर्षभर ९८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हजारो जन योद्धयाप्रमाणे या आजाराशी झुंजले. कोरोना शहीदांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी ५० लक्ष आणि पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने मिळणारी १० लक्ष मदत ही पथदर्शी आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी दिलासादायक भेट ही मनोबल वाढवणारी ठरली, अशा भावना सहपोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी व्यक्त केल्या.

Leave a comment

0.0/5