Skip to content Skip to footer

‘बुमराह-संजना’च्या लग्नाचा पहिला व्हिडिओ आला समोर, सोशल मीडियावर होत आहे ‘व्हायरल’

महाराष्ट्र बुलेटिन : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीव्ही अँकर संजना गणेशनबरोबर विवाहबंधनात अडकलेला आहे. दोघांनी सोमवारी गोव्यात जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या दोघांच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. jasprit.bumrah1 नावाच्या एका इन्स्टाग्राम हँडलवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये बुमराह आणि संजना एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसून येत आहे की, पुष्पहार घालण्यापूर्वी संजना जसप्रीत बुमराहला काहीतरी बोलते. नंतर दोघे हसत हसत एकमेकांच्या गळ्यात हार टाकतात.

https://www.instagram.com/reel/CMcA8qmAORJ/?utm_source=ig_embed

बुमराहने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो पोस्ट करत लग्नाची माहिती दिली. त्याने ट्विट केले की, ‘प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू केला आहे. आजचा दिवस आमच्या दोघांसाठी खूप महत्वाचा आहे. आम्ही आमच्या लग्नाची बातमी आणि आमचा आनंद शेअर केल्याने आम्हाला खूपच छान वाटत आहे.’

बुमराहच्या एका जवळच्या सदस्याने सांगितले की, ‘बुमराहच्या विवाह सोहळ्यात सुमारे ५० लोक उपस्थित होते, ज्यात दोन्ही बाजूच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.’ सध्या कोरोना विषाणूमुळे लग्नात मर्यादित लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू उपस्थित नव्हते.

बुमराहने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती, जी मंडळाने मान्य केली. त्याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यात तो खेळला नव्हता आणि पुढील सामन्यांमध्येही तो खेळणार आहे की नाही याबाबत भाष्य करणे कठीण आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने देखील नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने ट्विट करत म्हटले की, ‘नवीन प्रवासासाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.’

Leave a comment

0.0/5