Skip to content Skip to footer

एक दिवसांपूर्वी वर्षा संजय राऊत ईडी कार्यालयात हजर

एक दिवसांपूर्वी वर्षा संजय राऊत ईडी कार्यालयात हजर

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना ईडी कार्यलयाने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी नोटीस पाठवली . या नोटीसामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. वर्षा राऊत यांना मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस धाडण्यात आली होती.

मात्र आता या प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. वर्षा राऊत यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास चौकशीसाठी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. परंतु, त्याआधीच आज वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत.

‘संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि माधुरी प्रवीण राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत. या संस्थेकडून आधी ५६२५ रुपयांची रक्कम मिळाली आहे. पण १२ लाख रुपयांची कर्जाची रक्कम अद्याप बाकी आहे, असा खुलासा ईडीने आपल्या तपासातून केला होता.

Leave a comment

0.0/5