Skip to content Skip to footer

करोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव, मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून केंद्राकडे केली ही मागणी


ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे महाराष्ट्रात ८ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. नव्या स्ट्रेनची लक्षणे आढळून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.


त्यातच परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.


ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन करोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. तसेच यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा उपस्थित होते. लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, “लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

Leave a comment

0.0/5