Skip to content Skip to footer

मंत्री रावसाहेब दानवे विरोधात जावई हर्षवर्धन जाधवांनी फुंकले रणशिंग दिला ‘हा’ इशारा

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही अशी टीका कन्नड विधानसभा मतदार सांघाचे आमदार आणि मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केली होती. त्यामुळे ग्रामपंचातीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जाधव विरुद्ध दानवे असा वाद पाहायला मिळणार आहे.

दानवे यांच्या राजकीय दबावामुळे माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी लगावला. उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या जामिनात राजकीय दबावाने गुन्हे दाखल झाल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात लक्ष घालावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

पुढच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना घरी नाही बसवलं, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही. रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं, अशी विनंती आघाडी सरकारला केली आहे. आता या टीकेवर दानवे काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5