Skip to content Skip to footer

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसेचा जोरदार राडा, पोलिसांची कडक कारवाई

मनसे’ने शिवसेनेच्या कार्यक्रमात जोरदार राडा केला आहे. वसई विरार महापालिका परिवहन सेवेच्या उदघाटन कार्यक्रमात गोंधळ झाला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या नावाने ओरडत राडा करण्यास सुरवात केली.

महापालिका आयुक्त भेट नाकारत असल्याच्या कारणावरून, भर कार्यक्रमात आयुक्तांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन कार्यक्रमातून बाहेर काढले. त्यानंतर पोलीस स्टेशनलाही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला होता.

मनसे कार्यकर्ते आयुक्तांच्या भेटीची वेळ मागत होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळ झाला. काही पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. यावेळी मनसेकडून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आला. पोलीस सरकारचे दलाल असल्या सारखे वागत आहेत. सत्ता येते जाते पण पोलिसांनी पोलिसांसारखे काम करावे. सत्तेची दलाली आणि माज पोलिसांनी करू नये असा आरोप मनसेने पोलिसांवर लगावला होता.

Leave a comment

0.0/5