Skip to content Skip to footer

भाजपा आमदार प्रसाद लाड यांची होणार चौकशी

भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स धाडले आहे. २० दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता आमदार प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद लाड यांनी २००९ साली बृहमुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. याप्रकरणी २०१४ साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यामुळे प्रसाद लाड यांच्या अडचणीत अधिक वाढ होणार आहे.

बुधवारी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांचे निकटवारीत्या गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5