Skip to content Skip to footer

मुंबई कारशेड जागेसाठी सहा सदस्यीय समिती गठीत, ठाकरे सरकारचा निर्णय

ठाकरे सरकारने कारशेड जागेसंदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कारशेडसाठी जागा निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती मुंबई मेट्रो मार्गिका तीन, चार आणि सहा या तीन मेट्रो मार्गीकांचा एकत्रित कार डेपो करण्यासाठी अभ्यास करेल. समिती एका महिन्यात राज्य सरकारला याबाबत अहवाल सादर करणार आहे.

ही समिती आरे येथील यापूर्वी मेट्रो ३ कारशेड डेपोसाठी प्रस्तावित केलेला आराखडा पुरेसा आहे किंवा आणखी जमीन किंवा आणखी वृक्ष तोड करण्याची आवश्यकता भासेल का याबाबत तपासणी करणार आहे. याशिवाय मेट्रो तीन व सहा यांच्या मार्गीकेचे एकत्रीकरण सुलभरीत्या करणे शक्य आहे का तसेच याचा अंदाजित खर्च आणि कालावधी किती याचा अभ्यास समिती करणार आहे.

मेट्रो कार शेडचा अभ्यास करणारी ही समिती कांजूरमार्ग येथील जागा आरेपेक्षा सुयोग्य आहे का? याचीही तपासणी करेल. मेट्रो ३, ४ आणि ६ यांच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे जागा पुरेशी आणि सुयोग्य आहे का याचाही यात समावेश असेल.

Leave a comment

0.0/5