Skip to content Skip to footer

ठाकरे सरकारला आवाहन देणाऱ्या श्रीपाद छिंदमला कोर्टाचा दणका

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार शब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्दच ठेवण्यात आले आहे. या संदर्भातील निणर्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला छिंदमने हायकोर्टात आवाहन दिले होते. परंतु सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने छिंदमला दणका दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्यामुळे नगर महापालिका आणि राज्य सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द केले होते. शासन निर्णयाच्या विरोधात छिंदमने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयानेही श्रीपाद छिंदमला जोरदार डंका दिला आहे.

प्रकरण असे की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दणका दिला होता. श्रीपाद छिंदम याच नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचे पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता.

Leave a comment

0.0/5