Skip to content Skip to footer

महाराष्ट्र पोलिस दलाचा लौकिक उंचावू – नगराळे

महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वोकृष्ट पोलीस दल आहे. सर्व अधिकारी आणि अंमलदारांसोबत एकजुटीने काम करून लौकिक आणखी उंचावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे प्रभारी महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

जयस्वाल यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर नगराळे यांनी पत्रकार मद्यमांशी बोलताना आपले मत मांडले होते. राज्य सरकारने आपली या पदासाठी निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राज्यापुढे अनके आव्हाने आहेत ती सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.

पुढे बोलताना जयस्वाल म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था कायम राखताना नक्षलवाद आणि दहशतवाद बीमोड करायचा आहे. सर्व घटकांना बरोबर घेऊन प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडू, महिलांवरील आणि अत्याचारांवरील गुन्हा कमी करणे तसेच पोलिसांच्या समस्या सोडवणे हे प्रथम कर्तव्य असेल असे नगराळे यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5