Skip to content Skip to footer

नगरसेवक पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने ओपन जिमचे लोकार्पण

नगरसेवक पूर्वेस नाईक यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून नवीन पद्धतीने उभारलेल्या विश्रांती कट्टा,ओपन जिम, रेडिओ कट्टा व मेट्रो कट्टा यांचा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडला. युवासेना सचिव, नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी प्रभाग क्र. १४ मध्ये डवलेनगर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी “विश्रांती कट्टा”, शाळा क्र ४६ येथे तरुणांसाठी “ओपन जिम”, यशोधन नगर येथील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी “रेडिओ कट्टा”, रुणवाल प्लाझा येथील नागरिकांसाठी “मेट्रो कट्टा” तयार केला आहे.

या सर्व विकास कामांचा लोकार्पण सोहळा स्वतः नगरसेवक पुर्वेश सरनाईक, शिवसेना गटनेते नगरसेवक दिलीप बारटक्के, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका आशा डोंगरे, नगरसेविका कांचन चिंदरकर, युवासेनेचे संदीप डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नाविन्यपूर्ण पद्धतीने बनवण्यात आलेल्या कट्टे आणि जिम बद्दल तरुण आणि जेष्ठ नागरिकांमध्ये उत्साह आहे.

रेडिओ कट्टा या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या रेडिओ प्रतिकृतीमध्ये नागरिकांना जुनी गाणी ऐकण्याचा आनंद घेता  येणार आहे तसेच मेट्रो कट्ट्यात ठाणे मेट्रोची प्रतिकृती तयार केली असल्याने लहान मुले, तरुण मेट्रोत बसल्याचा अनुभव घेत आहेत. स्थानिक नागरिकांनीही याबद्दल प्रशंसा करून नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांचे आभार मानले.

Leave a comment

0.0/5