Skip to content Skip to footer

विराट आणि अनुष्काच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. या संदर्भातील माहिती ट्विट करून विराट कोहलीने आपल्या आणि अनुष्काच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे असे ट्विट विराट कोहलीने केले आहे.

“विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे”, असा दावा या ज्योतिषीने केला होता.

Leave a comment

0.0/5