Skip to content Skip to footer

आधी फडणवीस म्हणाले, आता संजय राऊत म्हणतात फासा आम्हीच पलटणार…. !

“फासा आम्हीच पलटणार, शिडीशिवाय फासा पलटणार” असं वक्तव्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सत्तांतर करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कमी शब्दात फडणवीसांना प्रतिउत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा” असं उत्तर राऊतांनी दिले आहे.

राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असे सांगतानाच “आम्हीच फासा पलटवू, शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल” असे सूचक भाष्य फडणवीसांनी केले होते. त्यात फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर राऊत यांनी सूचक वक्तव्य केले होते.

विधानसभा अध्यक्षपद खुले झाले आहे, त्यामुळे पुन्हा चर्चा होईल. सरकार स्थापन करताना पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद ठरलं होतं, तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील, हे कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे तीन पक्ष एकत्र निर्णय घेतील. तीन पक्षांचं बहुमत असलेलं हे सरकार आहे, त्यामुळे हा प्रकार टाळायला हवा होता, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Leave a comment

0.0/5