Skip to content Skip to footer

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका, भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार ?

येणाऱ्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक वाद वाढलेले आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेससमोर भारतीय जनता पक्षाने मोठं आव्हान उभं केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता तृणमूलनं भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतले आहे. भाजपच्या या राजकारणाला तृणमूलनं त्याच पद्धतीने उत्तर देण्याची तयारी केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील, असा दावा तृणमूलचे नेते आणि पश्चिम बंगालचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी केला.

Leave a comment

0.0/5